Std 9 Marathi Lesson 2.2 Santvanni – Santkrupa Jhalee – संतवाणी (आ) संतकृपा झाली

संतवाणी

(आ) संतकृपा झाली    संत बहिणाबाई

संतकृपा झाली ।

इमारत फळा आली ।।१।।

ज्ञानदेवें रचिला पाया ।

उभारिलें देवालया ।।२।।

नामा तयाचा किंकर ।

तेणें रचिलें तें आवार ।।३।।

जनार्दन एकनाथ ।

खांब दिधला भागवत ।।४।।

तुका झालासे कळस ।

भजन करा सावकाश ।।५।।

बहिणी म्हणे फडकती ध्वजा ।

निरूपणा केलें बोजा ।।६।।

कवितेचा परिचय

प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्येसंतांचा मोलाचा वाटा कसा आहे. याचे वर्णन केलेले आहे.

Central Idea of the devotional song:

In this devotional song, Saint Bahinabai has described how the saints have given their valuable contibution in building the varkari (pilgrim) community in Maharashtra.

शब्दार्थ :

संत – सत्पुरुष, सज्जन – a saint

कृपा – दया, करुणा – mercy, kindness

वारकरी – पंढरीला जाणारा यात्रेकरू – a pilgrim

संप्रदाय – मार्ग, पंथ – a system of religious doctrine, religious community

मोलाचा : महत्वाचा – valuable, precious

वाटा – भाग, हिस्सा – a share, a portion

ज्ञानदेवें – संत ज्ञानेश्वर – Saint Dnyaneshwar

रचिला – रचला – arranged, constructed

पाया – तळ बांधताना केलेले भक्कम काम – foundation, base

उभारिले – उभारले – raised

देवालय – मंदिर, देऊळ – a temple

नामा – संत नामदेव – Saint Namdev

तयाचा – त्याचा – his

किंकर – सेवक – a servant

आवार – अंगण, प्रांगण – a courtyard

एकनाथ – संत एकनाथ

खांब – स्तंभ – a pillar, a column

दिधला – दिला – gave

भागवत – विष्णभक्तांचा पंथ – worshipers of Lord Vishnu

तुका – संत तुकाराम

कळस – शिखर, घुमट – the apex, top

भजन – देवाचे स्तुति गीत – devotional song

सावकाश – संथपणे, हळूहळू – slowly, gently

बहिणी – संत बहिणाबाई – Saint Bhahinabai

ध्वज – झेंडा, निशाण – a flag

निरूपण – विवेचन, व्याख्यान – explanation

बोजा – जबाबदारी – a burden, a load

वाक्प्रचार :

फळा येणे – बहरणे, वाढ होणे

पाया रचणे – आरंभ करणे, बैठक तयार करणे

कळस होणे – उच्चस्थान प्राप्त करणे, परिपूर्णता आणणे

निरूपण करणे – भाष्य करणे, वर्णन करणे, विवेचन करणे

कवितेचा भावार्थ

संतकृपा झाली ।

इमारत फळा आली ।।१।।

भावार्थ

संतकृपेमुळे ही ईमारत (मणजे वारकरी संप्रदाय) फलद्रूप झाली

It is due to the blessings of all the saints that the varkari community has borne fruit.

ज्ञानदेवें रचिला पाया ।

उभारिलें देवालया ।।२।।

भावार्थ

संत ज्ञानेश्वरांनी या मंदिराचा पाया रचला म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना केली.

Saint Dnyaneshwar erected the foundation of this temple.

नामा तयाचा किंकर ।

तेणें रचिलें तें आवार ।।३।।

भावार्थ

संत नामदेव या देवळाच्या भिंतीचे दगड होऊन त्या देवळाचे आवर रचिले.

Saint Namdeo is the small stone in the wall surrounding the temple. In this way he created the temple coutyard.

जनार्दन एकनाथ ।

खांब दिधला भागवत ।।४।।

भावार्थ

संत जनार्दन व संत एकनाथ यांनी मंदिराला खांबाची बळकटी दिली.

Saint Janardan and Saint Eknath who are the worshipers of Lord Vishnu, became the pillars and thus gave strength to the temple.

तुका झालासे कळस ।

भजन करा सावकाश ।।५।।

भावार्थ

या मंदिराचा कळस संत तुकाराम झाले. ही इमारत पूर्ण  झाली.

Saint Tukaram became the top and thus completed the temple structure.

बहिणी म्हणे फडकती ध्वजा ।

निरूपणा केलें बोजा ।।६।।

भावार्थ

संत बहिणाबाई म्हणतात या मंदिरावर ध्वजा फडकत आहे. या वारकरी धर्माचा प्रचार निरुपणाने मी पार पाडत आह.

Saint Bahinabai says that now the flag is fluttering high. And through devotional songs she is spreading this varkari religion.

स्वाध्याय

प्र. १. चौकटी पूर्ण करा.

उत्तर:

वारकरी संप्रदायरूपी इमारत उभे करणारे साहित्यिकरूपी संत
कळस चढवणार संत तुकाराम
पाया रचणार संत ज्ञानेश्वर
भिंती उभारणार संत नामदेव
खांब होणार संत जनार्दन व संत एकनाथ

प्र. २. कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.

उत्तर:

वारकरी संप्रदायरूपी इमारती संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.
पाया रचण वारकरी संप्रदायाची स्थापना के ली.
आवार रचण पररसर प्रचारानेव्यापक के ला.
खांब होण संप्रदायाला गुरुकृ पेनेबळकट के ले.
कळस चढवणे पररपूणथ वैभवापयंत पोहोचवला.

प्र. ३. भावार्थाधारित.

(१) ‘तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।’

या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.

उत्तर:

संत बदहणाबाई यांनी या अभंगात वारकरी संप्रदायरूपी देवळाचे रूपक वापरले आहे. त्या म्हणतात – या वारकरी संप्रदायाला सपं णू श वैभव संत तुकारामांनी प्राप्त करून ददले. म्हणजे या मंददराचा कळस संत तकु तुकाराम झाले. ही इमारत पूर्ण झाली.

(२) ‘ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।’

या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.

उत्तर:

संत बदहणाबाई यांनी या अभंगात वारकरी संप्रदायरूपी देवळाचे रूपक वापरले आहे. त्या म्हणतात – संत ज्ञानेश्वरांनी या मंददराचा पाया रचला म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना के ली.

उपक्रम :

‘भक्तिगंगेच्या वाटेवर’ या हे. वि. इनामदार यांच्या पुस्तकाचे वर्गात सामूहिक वाचन करा.

भाषाभ्यास :

अलंकाराच्या संदर्भातील महत्त्वाचे शब्द पुढीलप्रमाणे असतात.

  1. उपमेय – ज्याची तुलना करायची ते उपमेय.
    उदा., आंबा साखरेसारखा गोड आहे. या उदाहरणात आंबा हे उपमेय आहे.
  2. उपमान – ज्याच्याबरोबर तुलना करावयाची ते उपमान.
    उदा., इथे साखर हे उपमान.
  3. समान धर्म – दोन वस्तूंत असलेला सारखेपणा किंवा दोन वस्तूतील समान गुणधर्म.
    उदा., गोडपणा.
  4. साम्यवाचक शब्द – वरील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द. उदा., सारखा.

खालील उदाहरणातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.
(अ) आईचे प्रेम सागरासारखे असते.
(आ) आमच्या गावचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत.
(इ) राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे.

उपमेय उपमान समान धर्म साम्यवाचक शब्द
आईचे प्रेम सागर सारखे प्रेमळपणा
गावचे सरपंच कर्ण सारखे दानशूरपणा
राधाचा आवाज कोकिळा सारखा मधुरपणा

प्र. ४. अभिव्यक्ती.

(१) संतांचे कार्य नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

उपक्रम :

‘भक्तिगंगेच्या वाटेवर’ या हे. वि. इनामदार यांच्या पुस्तकाचे वर्गात सामूहिक वाचन करा.