Std 9 Lesson 1. Sarvatmaka Shivsundara सर्वात्मका शिवसुंदरा

कुसुमाग्रज-विष्णु वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार. ‘जीवनलहरी’, ‘विशाखा’, ‘समिधा’, ‘स्वगत’, ‘हिमरेषा’, ‘वादळवेल’, ‘मारवा’, किनारा’ इत्यादी काव्यसंग्रह; ‘वैजयंती’, ‘राजमुकुट’, ‘कौंतेय’, ‘नटसम्राट’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘विदूषक’ इत्यादी नाटके प्रसिद्ध.

कवितेचा परिचय :

परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची, संकटातही सामना करण्याची शक्ती, कवी प्रस्तुत गीतातून मागत आहेत.

Central Idea:

In this prayer song, the poet is praying to God and requesting him to take us from darkness to light. He is also telling God to give us the strength to face all our problems and difficulties.

१. सर्वात्मका शिवसुंदरा

सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना।

तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुच्या ने जीवना।।

सुमनांत तू गगनात तू

ताऱ्यांमध्ये फुलतोस तू

सद्‍धर्म जे जगतामधे

सर्वांत त्या वसतोस तू

चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना।।

श्रमतोस तू शेतामधे

तू राबसी श्रमिकांसवे

जे रंजले वा गांजले

पुसतोस त्यांची आसवे

स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना।।

न्‍यायार्थ जे लढती रणी

तलवार तू त्यांच्या करी

ध्येयार्थ जे तमि चालती

तू दीप त्यांच्या अंतरी

ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना।।

करुणाकरा करुणा तुझी

असता मला भय कोठले

मार्गावरी पुढती सदा

पाहीन मी तव पाउले

सृजनत्व या हृदयामध्येनित जागवी भीतीविना।

शब्दार्थ :

 1. ज्ञानपीठ पुरस्कार – साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार
 2. सर्वात्मका – सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी असलेला जीवात्मा, परमेश्वर (the soul of all, the entire self)
 3. शिव – शंकर (God Shiva)
 4. सुंदरा – सुंदर (beautiful)
 5. स्वीकार – अंगीकार (acceptance)
 6. अभिवादन – वंदन, नमन (salutation)
 7. तिमिर – अंधार, काळोख (darkness)
 8. तेज – प्रकाश, लकाकी (brightness)
 9. प्रभु – ईश्वर, देव (God, Lord)
 10. जीवन – आयुष्य (life)
 11. सुमन – फूल (a flower)
 12. गगन – आकाश, नभ (the sky)
 13. तारा – चांदणी (star)
 14. सद्धर्म – चांगला धर्म, सदाचार (good quality, good conduct)
 15. जग – दुनिया, विश्व (the world, the universe)
 16. वसणे – राहणे, वस्ती करणे (to establish, to stay)
 17. चोहिकडे – सभोवार, सर्वत्र (everywhere, all round)
 18. रूप – आकार (form, shape)
 19. जाणीव – बोध, आकलन (consciousness, realization)
 20. मन – चित्त, अंत:करण (the mind)
 21. राबसी – राबतोस, भरपूर कष्ट करतोस (to work hard)
 22. श्रमिक – कामकरी, कष्ट करणारा (a labour, a worker)
 23. रंजले – त्रासले (to be harassed)
 24. गांजणे – त्रासून जाणे, सतावले जाणे (to be harassed)
 25. आसवे – अश्रू (tears)
 26. स्वार्थ – स्वत:चा लाभ, मतलब (selfishness)
 27. पद – पाय, पाऊल (a foot, a foot step)
 28. न्याय – नीती (justice)
 29. रण – रणभूमी, युद्धाची जागा, रणांगण (battlefield)
 30. कर – हस्त, ह्यत (hand)
 31. ध्येय – उद्दिष्ट, साध्य (a goal, an aim)
 32. तमी – तम, अंधकार काळोख (darkness)
 33. अंतरी – आतमध्ये (in interior)
 34. ज्ञान – माहिती, प्रतिती (knowledge)
 35. तपती – तपतात (experience burning, blazing, heat)
 36. मुनि – ऋषी, साधू, तपस्वी (a holy sage)
 37. साधना – तपश्चर्या (penance)
 38. करुणा – दया (compassion, mercy)
 39. भय – भीती, धास्ती (fear, fright)
 40. मार्ग – रस्ता (way)
 41. सदा – नेहमी (always)
 42. तव – तुझे (yours)
 43. पावले – पाऊले, पाय (feet)
 44. सूजनत्व – नवनिर्मिती (creation)
 45. नित – नेहमी, सदा (always, daily, everyday)
 46. जगवि – जागव (to wake up)

सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना।

तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुच्या ने जीवना।।

भावार्थ:

हे प्रभु तू आमच्या जीवनाला अंधारातून प्रकाशकडे ने. अज्ञानातनू ज्ञानाकडे ने. हे परमेश्वरा, तू पवित्र व सुंदर आहेस. आमची वंदन स्वीकार कर.

O universal and beautiful God Shiva, accept our salutation and take our life from darkness towards light.

सुमनांत तू गगनात तू

ताऱ्यांमध्ये फुलतोस तू

सद्‍धर्म जे जगतामधे

सर्वांत त्या वसतोस तू

चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना।।

भावार्थ:

हे परमेश्वरा या जगात जे काही चांगले आहे, चांगली शिकवण आहे त्यात तू आहेस. फुलाफुलांत तू आहेस, आकाशात तू आहेस, ताऱ्यांमध्ये चमचमत फुलणारा तूच आहेस. जे धर्म  आहेत त्या सर्व धर्मात तूच आहेस, तुझेच अस्तित्व आहे, तुझेच रूप आहे. याची सतत जाणीव आमच्या मनाला आहे.

You are present in the flowers and in the sky. You are blooming in the stars. And in this world, you dwell in everything that is a pious and holy religion. My mind can feel your presence in all the different forms and objects present all around.

श्रमतोस तू शेतामधे

तू राबसी श्रमिकांसवे

जे रंजले वा गांजले

पुसतोस त्यांची आसवे

स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना।।

भावार्थ:

शेतामद्धे काम करणाऱ्या शेतकर्याच्या रूपात तू काम करताना दिसतोस. कष्टकरी बांधवांच्या रूपात तूच राबत असतोस. जे दुःखी, पीडित लोक आहेत, त्याांचे अश्रू तूच पुसतोस. जिथे तिथे स्वार्थाशीवाय सेवा करणारी सज्जन मणसे  असतात, तिथे तुझी पवित्र पावले उमटलेली असतात.

You not only toil in the fields but you dwell among hard working labourers. You wipe off the tears of all those you are sad and suffering. Where ever there are people serving others selflessly, you footprints are present there.

न्‍यायार्थ जे लढती रणी

तलवार तू त्यांच्या करी

ध्येयार्थ जे तमि चालती

तू दीप त्यांच्या अंतरी

ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना।।

भावार्थ:

रणागणामध्ये जे न्यायासाठी लढतात त्याांच्या हातातील तलवार तूच आहेस. उराशी ध्येय जपत जे लोक अधांरापासून चालतात, त्याांच्या मनातला पेटता प्रकाशा मध्ये दिवा तूच आहेस. ज्ञानप्राप्तीसाठी जे योगी तप करतात, त्याांची साधना तूच आहेस.

You are sword in the hands of all those soldiers who fought for justice. You are the lamp to those people who are walking in darkness with a very strong goal. You also present in the spiritual penance of all those holy sages who are in pursuit of knowledge.

करुणाकरा करुणा तुझी

असता मला भय कोठले

मार्गावरी पुढती सदा

पाहीन मी तव पाउले

सृजनत्व या हृदयामध्येनित जागवी भीतीविना।

भावार्थ:

हे दयाळू परमेश्वरा तुझी कृपादृष्टी  माझ्यावर असताांना मला अजिबात भीती वाटत नाही. भीतीशिवाय नवनिर्मिती  करण्याची आस माझ्या ह्रदयात नेहमी जागी ठेवावी, हि प्राथना आहे. जीवनाचा मार्ग चालताना माझ्यासोबत तुझे चरण  मी नेहमी पाहत राहीन.

I do not fear anything, whenever you show mercy and compassion, O Compassionate one! And whenever I see your footsteps I fearless move onwards. So let me confidently have creativity and newness in my heart, this I pray.